भाजपाच्या मोर्चाने भुसावळ दणाणले

बंद रेशनकार्ड सुरू करा व वरणगावात महसूल कक्षाची मागणी


भुसावळ : वरणगाव शहरात असंख्य रेशनकार्ड बंद असल्याने ते कार्ड सुरू करून त्यावर धान्य सुरू करावे व तहसीलच्या कामासाठी वरणगावकरांना वारंवार भुसावळ येणे शक्य होत नसल्याने वरणगाव येथे स्वतंत्र कक्ष स्थापन करावा या प्रमुख मागणीसाठी भाजपातर्फे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांच्या प्रमुख नेतृत्वात गुरुवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकर्‍यांनी तहसीलबाहेर तब्बल तासभर ठिय्या मांडत महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. प्रसंगी 9 व 10 डिसेंबर रोजी वरणगाव शहरात रेशनकार्डासाठी शिबिर घेणार असल्याची ग्वाही तहसीलदार दीपक धीवरे यांनी दिल्याने मोर्चेकरी शांत झाले.

तासभर मोर्चेकर्‍यांचा ठिय्या
माजी नगराध्यक्ष सुनील काळे, सुनील माळी, प्रणिता पाटील, डॉ.प्रवीण चांदणे, साबीर कुरेशी, अरुण बावणे, मिलिंद भैसे, मुस्लिम अन्सारी, ईरफान पिंजारी, मिलिंद मेढे, आकाश निमकर, पप्पू ठाकरे, संदीप माळी, कृष्णा माळी, नटराज चौधरी, रमेश पालवे, अनिल वंजारी, लखन माळी, संदीप भोई, मयुर गावंडे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढून भुसावळ तहसीलदारांच्या दालनाबाहेर तासभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.



प्रशासन नरमले : वरणगावात होणार शिबिर
तहसीलदार दीपक धीवरे यांनी वरणगाव येथे 9 व 10 डिसेंबर रोजी वरणगाव येथे शिबिर घेण्याचे आश्वासन मोर्चेकर्‍यांना दिले तसेच बंद रेशन कार्डावरील धान्य सुरू करून वरणगाव शहरात स्वतंत्र महसूल कक्ष उघडण्याबाबत जिल्हाधिकारी यांची परवानगी घेण्यात येईल, असे आश्वासन मोर्चेकर्‍यांना दिले. यावेळी गजानन वाघ, राहुल जंजाळे , बबलू शहा, कस्तुरबाई इंगळे, आशा साबळे, मुमताजबी शहा, घणाबाई माळी, कोकिळाबाई तांबे, शबा शहा, गोपाळ साबळे, अमोल साबळे, दिनेश साबळे व नागरीक तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !