रावेरात 30 रोजी रक्तदान शिबिर
रावेर : थॅलेसिमियाने आजाराने ग्रासलेल्या शहरातील 13 वर्षीय अनुष्कासाठी शहरात मंगळवार, 30 रोजी रक्तदान शिबिराचे आयेाजन करण्यात आले आहे. रावेर शहरातील गांधी चौकातील सामान्य कुटूंबातील ज्ञानेश्वर नारायण चौधरी यांची अनुष्का ही कन्या आहे. जन्माच्या तिसर्या महिन्यापासून थॅलेसिमिया आजाराने ती ग्रस्त आहे. थॅलेसिमिया हा एक अनुवांशिक आजार असून या रुग्णांच्या शरीरात स्वतःचे रक्त तयार होत नाही त्यामुळे या रुग्णांना दर 15 दिवसांनी रक्ता द्यावे लागते. थॅलेसिमिया पीडीत रुग्णांच्या रक्ताची गरज त्यांचे आई-वडील कधीच पूर्ण करू शकत नाही. त्यांच्यासाठी रक्तदान करणारे समाजातील रक्तदाते हे त्यांचे पालक बनुन रक्तदान करू शकतात.
दात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन
रावेर तालुक्यात थॅलेसिमिया या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले जवळपास सुमारे 10 ते12 रुग्ण आहेत. यांनाही या रक्तदान शिबिराचा उपयोग व्हावा या उद्देशाने यंदा या रक्तदान शिबिराचे बुधवार, 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजे दरम्यान गांधी चौक, रावेर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सहकार्य करावे, असे आवाहन ज्ञानेश्वर चौधरी व मित्र परीवाराने केले आहे.


