भुसावळातील बियाणी मिलीटरी स्कूलजवळ डंपर-बोलेरोत अपघात : चालक जखमी
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील बियाणी मिलीट्ररी स्कूलजवळ गुरूवारी रात्री आठच्या सुमारास डंपर आणि बोलेरा वाहनात धडक होवून अपघातात बोलेरा वाहनाीवरील चालक किरण भोईटे हे जखमी झाले. अपघाताचे वृत्त कळताच बाजारपेठ पोलिसांनी धाव घेतली.
समोरा-समोर धडकली वाहने
बोलेरो पिकअप वाहन (क्रमांक एम.एच.19 सी.वाय.2147) ही भुसावळकडून चोरवडकडे जात असताना डंपर (एम.एच.19 सी.वाय.5895) हे भुसावळकडे येत असताना बियाणी मिलिटरी स्कूलजवळ रात्री आठच्या सुमारास दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात बोलेरा वाहनावरील चालक किरण भोईटे (रा.खडका) हा जखमी झाला. जखमीला तत्काळ शहरातील खाजगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. घटनास्थळी सहा.फौजदार तस्लीम पठाण यांच्यासह त्यांचे सहकारी जितू पाटील, दीपक पाटील, प्रणय पवार यांनी धाव घेतली. अपघातग्रस्त डंपर ताब्यात घेत ते डीवायएसपी कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले. पोलिसांनी यावेळी रस्त्यावर जाम झालेली वाहतूक सुरळीत केली. अपघातातील बोलेरो वाहन हे चोरवड येथील वीज कंपनीची असल्याचे पोलिसांनी सांगितले.


