भुसावळात आपले मानवाधिकार संघटनेतर्फे अधिकार्‍यांना संविधान प्रत भेट


भुसावळ : भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून आपले मानवाधिकार संघटनेतर्फे शहरातील विविध लोकप्रतिनिधींसह शासकीय अधिकार्‍यांना संविधानाची प्रत भुसावळ तालुकाध्यक्ष मयूर राजेंद्र अंजाळेकर यांनी भेट दिली.

अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
आपले मानवाधिकार फाउंडेशनतर्फे भुसावळचे आमदार संजय सावकारे, डी.वाय.एस.पी.सोमनाथ वाघचौरे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, नगरपालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार तसेच विविध मान्यवरांसह अधिकार्‍यांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली. दरम्यान, यावल तालुक्यातील आदिवासी पाड्यावर संविधान दिनानिमित्त संविधान शपथ तसेच फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी भुसावळ तालुकाध्यक्ष मयूर राजेंद्र अंजाळेकर आणि महाराष्ट्र राज्य व्यवस्थापक तसेच संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी परीश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !