नगरपंचायत निवडणूक : बोदवडमध्ये खासदार रक्षा खडसेंनी घेतला आढावा
बोदवड : बोदवड नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून 21 डिसेंबर रोजी निवडणूक होत असल्याने शहराता आचारसंहिता जारी झाली आहे. आगामी निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी खासदार रक्षाख डसे यांनी पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते अनंत कुलकर्णी यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीत नगरपंचायत निवडणूक संदर्भात इच्छुक उमेदवार तसेच भाजपातर्फे करण्यात येणार्या नियोजनाबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.
यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला खासदार रक्षा खडसे यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्ते तथा मर्गदर्शक अनंत कुलकर्णी, तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष विक्रम वरकड, बोदवड शहराध्यक्ष नरेश अहुजा, तालुका सरचिटणीस राजेंद्र डापसे, सोशल मिडिया तालुकाध्यक्ष रोहित अग्रवाल, शहर उपाध्यक्ष धनराज सुतार, भाजयुमो शहराध्यक्ष अभिशेख झाबक, भाजयुमो शहर उपाध्यक्ष राहुल माळी, भाजपा चित्रपट कामगार आघाडी जिल्हा सदस्य उमेश गुरव, शहर चिटणीस वैभव माटे, भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अनिता अग्रवाल, महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस शीतल देशमुख, महिला आघाडी तालुकाध्यक्ष वैशाली कुलकर्णी, मुक्ताबाई पाटील, बुथ प्रमुख संतोष चौधरी, विक्रम पाटील, जीवन माळी, विशाल तायडे आदी यावेळी उपस्थित होते.

