भू संपादीत जमिनींचा उत्कृष्ट मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करणार
साकेगावात भुसावळ प्रांताधिकारी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणेंची ग्वाही
भुसावळ : वेस्टर्न रेल्वे प्रशासनाने भुसावळ शहर व साकेगाव शिवारातील भू संपादीत केलेल्या जमिनींचा मोबदला जास्तीत-जास्त मिळावा तसेच भूसंपादन करताना कुठल्याही शेतकरी बांधवांवर अन्याय होणार या संदर्भात अहवालाचे वाचन समस्त शेतकरी बांधवांच्या समक्ष करण्यात आले. या संदर्भात काही त्रृटी असतील, शेतकर्यांच्या समस्या असतील व प्रश्न असतील ते जाणून घेण्यात आले. शेतकर्यांच्या सर्व प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका प्रशासनाचे असून जास्तीत-जास्त मोबदला तसेच हस्तांतरीत झालेल्या प्रकल्पबाधीत शेतकर्यांना रेल्वे प्रशासनाने परीवारातील एक सदस्याला नोकरी द्यावी, असे सर्वानुमते मागणी साकेगावातील बैठकीत करण्यात आली.
यांची बैठकीला उपस्थिती
या संदर्भात संपूर्ण जीआरची माहिती रवींद्र पाटील यांनी प्रांत यांना प्रत सादर करून दिली. शेतकर्यांची कैफियत प्रशासनाला अहवालाद्वारे कळविण्यात येईल, असे प्रांत सुलाणे यांनी स्पष्ट केले. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने प्रांतांचा सत्कार करण्यात आला तसेच गाव परीसरातील शेतकरी बांधवांना शक्य तितकी मदत प्रशासनाने करावी, अशी मागणी सरपंच आनंद ठाकरे यांनी यावेळी केली. प्रसंगी रेल्वे विभागीय इंजिनियर कुमार, उपसरपंच आनंद ठाकरे, तलाठी बारी तसेच प्रशासन व शेतकरी यांच्यामधील संपर्क अभियान राबविणारी संस्था व त्यांचे प्रमुख पदाधिकारी तसेच समस्त प्रकल्पबाधीत शेतकरी आदींची उपस्थिती होती.


