फैजपूरात एटीएम फोडले : अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल


फैजपूर : शहरातील यावल रोडवरील दुध शीतकरण केंद्राजवळील भारतीय स्टेट बँकेचे बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने कापण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार शनिवारी पहाटेस उघडकीस आणला मात्र सुदैवाने चोरट्यांना एटीएम फोडता न आल्याने एटीएममधील सुमारे 45 लाखांची रोकड बचावली होती. या प्रकरणी शनिवारी रात्री उशीरा फैजपूर पोलीस ठाण्यात सीएमएस कंपनीचे एटीएम मॅनेजर आदेश विजय अहिरे (27, जेलरोड, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आवाहन
फैजपूर शहरातील फैजपूर येथील दूध शीतकरण केंद्राच्या समोर यावल रोडवर स्टेट बँक ऑफ इंडीयाचे एटीएम लावण्यात आले असून शनिवार, 27 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास एटीएममधून धुर निघत असल्याचे कळताच नागरीकांनी पोलीस प्रशासनासह बँक प्रशासना माहिती कळवली होती. पोलिसांच्या पाहणीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला असलातरी रोकड मात्र सुरक्षीत असल्याचे निष्पन्न झाले होते. अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या मदतीने एटीएमला कापल्याने मशीनला आग लागल्याने तातडीने आग विझवण्यात आली तर या प्रकारामुळे मशीनचे दोन लाख 31 हजार रुपयांचे नुकसान करण्यात आल्याने शनिवारी रात्री 11 वाजता एटीएएम ऑफीसर आदेश विजय अहिरे (27, रा.जेलरोड, नाशिक) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

टेक्नीशीयन आल्यानंतर अन्य बाबी स्पष्ट होणार
एटीएम मशीनच्या डिजिटल लॉकचे गॅस कटरच्या वापरामुळे नुकसान झाले असून हे मशीन उघडण्यासाठी आता दिल्ली येथून तांत्रिक कर्मचारी (टेक्नीशीयन) आल्यानंतर एटीएममधील शिल्लक रोकड, फुटेज प्राप्त होणार आहे. किमान दोन दिवसात ही प्रक्रिया होणार असल्याचे सहा.निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांकडून एटीएम केंद्रासह लगतच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जात असून त्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !