यावल तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांना सर्पदंश
यावल : यावल तालुक्यातील बोरखेडा खुर्द तसेच डोंगरकठोरा येथे शनिवारी दोन जणांना सर्पदंश झाला. दोघांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी एकाची प्रकृती खालावल्याने तातडीने जळगाव येथील जीएमसीत हलवण्यात आले. बोरखेडा खुर्द येथील सद्दाम कलंदर तडवी (23) हा तरुण शेतात काम करत असताना त्यास सर्पदंश झाला तर दुसर्या घटनेत डोंगरकठोरा येथील दिलीप आनंदा डोळे (52) यांना शेतात कडबा बांधणीचे काम करताना उजव्या पायाला सापाने चावा घेतला. त्यांना देखील तातडीने यावल रुग्णालयात दाखल करण्यात आले.


