यावलमध्ये महसूल पथकाला वाळू वाहतूकदार ट्रॅक्टर चालकासह मालकाकडून मारहाण


यावल : महाजन गल्लीतून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍या एका ट्रॅक्टरला महसूल पथकाने थांबवले मात्र चालक व मालकाने शासकीय कामात अडथळा निर्माण करत पथकाला धक्काबुक्की करीत वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेले. शनिवारी सकाळच्ी घडलेल्या या घटनेप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

यावल पोलिसात गुन्हा दाखल
यावल मंडळाधिकारी शेखर तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी सकाळी साडेसात वाजता साकळी व यावल मंडळाधिकार्‍यांचे पथक शहरात होते. यावेळी महाजन गल्लीतून मोठा वाड्यातून एका ट्रॅक्टरची ट्रॉली वाळू वाहतूक करताना दिसले त्यामुळे पथकाने ट्रॅक्टर चालक सुधाकर ज्ञानेश्वर सपकाळे याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवान्याबाबत विचारणा केली असता चालकाने ट्रॅक्टर हे भरत गोपाळ कोळी यांचे असल्याचे सांगितले. त्यानंतर ही वाळू चोरुन आणल्याची खात्री झाली. चालक व मालकाने मंडळाधिकारी पी.ए.कडनोर यांना धक्काबुक्की करुन ट्रॅक्टर पळवून नेले. याप्रकरणी यावल पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावल तालुक्यात वाळू माफियांची मुजोरी वाढत असून महसूल प्रशासनाने धडक मोहिम राबवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !