प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत
भुसावळ : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांना अखिल भारतीय पुरोगामी पत्रकार संघ, महाराष्ट्र मुंबई या ख्यातनाम संघटनेतर्फे चिंतामणी लॉन्स, मालेगाव येथे झालेल्या संघाच्या पाचव्या वर्धापन दिन व पत्रकार संमेलनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
या कार्यक्रमास कृषिमंत्री दादा भुसे, बाराव्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेतील कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी, पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी माधव थैल, सचिव विनोद पवार, महिला अध्यक्षा सुनीता तोमर, प्रमुख सल्लागार सुभाषजी बिंदवाल यांची होती उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते प्रा.ललवाणी यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. विनोद पवार व सुभाष बिंदवाल यांनी प्रा.ललवाणी यांनी केलेल्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक व अन्य सेवाकार्याचा याठिकाणी परामर्श घेतला. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या असंख्य सरकार्यांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल असंख्य प्रेमींनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, सोशल मिडीयाद्वारे त्यांचे अभिनंदन केले. प्रा.ललवाणी यांनी आपल्या मनोगतातून परमेश्वर, स्व.आई तारादेवी, स्व.सुपूत्र स्वप्नील, स्व.मोतीभाऊ कोटेचा, परीवार व आपल्यावर प्रेम करणार्या सर्व मित्रांना हा पुरस्कार अर्पण करीत असल्याचे नम्रपणे नमूद केले.


