नराधम भावाने केला बहिणीवर अत्याचार : या तालुक्यातील घटना

अत्याचारातून पीडीता गर्भवती : एका आरोपीला अटक


बीड : बहिण भावाच्या नात्याला कलंक लावत बीड तालुक्यात सख्ख्या भावासह चुलत भावाकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या अत्याचारामुळे अल्पवयीन पीडिता गर्भवती राहिल्याने हा संतापजनक प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

दोघांच्या अत्याचारातून पीडीता गर्भवती
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर, तिच्या सख्या भावासह चुलत भावाने लैंगिक अत्याचार केला. यामधून सदरील पिडीत अल्पवयीन मुलगी, गर्भवती राहिल्याने हि घटना समोर आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा सख्ख्या भावासह, चुलत भाऊ व अन्य एकावर कलम 376 (2) (ख) (छ) (ऋ), 354 (अ) 34 भादवि सह (छ) 3, 8, 12 प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे तर पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून इतर दोन आरोपींचा ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !