भुसावळकरांची वाढली चिंता : सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाचा आढळला रुग्ण


भुसावळ : गुरुवार पाठोपाठ शहरात सलग दुसर्‍या दिवशी शुक्रवारी देखील कोरोनाचा नवीन रुग्ण आढळल्याने शहर व ग्रामीण भागातील नागरीकांची चिंता वाढली आहे. प्रशासनाने खबरदारीचे आवाहन केले आहे. यापूर्वीच्या आठवड्यात शहर आणि ग्रामीण भागात एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नव्हता मात्र आता सलग दोन दिवसांपासून रूग्ण आढळत आहे. त्यामुळे एकूण सक्रिय रुग्णांची संख्या दोन झाली. नागरीकांनी घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. हात वारंवार साबण किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. विभागातील यावल, रावेर, मुक्ताइनगर, बोदवड येथे मात्र एकही रुग्ण आढळला नाही. या चारही तालुक्यातील सक्रिय रुग्ण संख्या शून्य आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !