बिलासपूर येथील कामामुळे 20 प्रवासी गाड्या रद्द

4 ते 12 डिसेंबरपर्यंतचे वेळापत्रक रेल्वेकडून जाहीर


भुसावळ : बिलासपूर विभागात चौथी लाईन कनेक्टिव्हीटीचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. यामुळे भुसावळ विभागातून बिलासपूरकडे जाणार्‍या तब्बल 20 मेल, एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. परीणामी प्रवाशांचे चांगलेच हाल होणार आहेत.

या गाड्या केल्या रद्द
बिलासपूर येथील कामामुळे रद्द केलेल्या गाड्यांमध्ये 12870 अप हावडा ते मुंबई 10 डिसेंबर, 12869 डाउन मुंबई ते हावडा ही गाडी 12 डिसेंबर, वलसाड-पुरी (22909) ही गाडी 9 डिसेंबर, पुरी-वलसाडी ही गाडी 12 डिसेंबर, संत्रागाची ते पुणे ही गाडी 4 डिसेंबर, पुणे-संत्रागाची ही गाडी 6 डिसेंबर, हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी 4 डिसेंबर, एलटीटी-हटिया ही गाडी 6 डिसेंबर, पुरी-एलटीटी ही गाडी 7 डिसेंबर, एलटीटी-पुरी ही गाडी 9 डिसेंबर, भुवनेश्वर-एलटीटी ही गाडी 6 व 9 डिसेंबर, एलटीटी-भुवनेश्वर ही गाडी 8 व 11 डिसेंबर, कामाख्य-एलटीटी 4 डिसेंबर, एलटीटी-कामाख्य 7 डिसेंबर, हावडा ते मुंबई 5 डिसेंबर, मुंबई-हावडा ही गाडी 7 डिसेंबर, तर एलटीटी-शालिमार ही गाडी 8 डिसेंबरला रद्द असेल. याशिवाय शालिमार ते एलटीटी 10 डिसेंबर, पोरबंदर-संत्रागाची 3 डिसेंबर, संत्रागाची-पोरबंदर ही गाडी 5 डिसेंबरला रद्द केली आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. दरम्यान, आधीच एसटीचा संप, त्यात महत्वाच्या रेल्वे गाड्या रद्द होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !