धक्कादायक ! : ओमायक्रॉनच्या भितीने डॉक्टरांनी केली पत्नीसह मुलांची हत्या !


नवी दिल्ली : ओमायक्रॉन हा सर्वांचा नाश करेल या भितीतून एका डॉक्टरने पत्नी, मुलगा व मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये उघडकीस आला आहे. डॉ.सुशील कुमार हा कानपूरमधील एका हॉस्पिटलमध्ये फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्याने 48 वर्षीय पत्नी, 18 वर्षीय मुलगा आणि 15 वर्षीय मुलीची हत्या केली. त्यानंतर भावाला फोन करून त्याने या तिहेरी हत्याकांडाची माहिती दिली. यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला.

तिघांची हत्या करून डॉक्टर पसार
डॉ.सुशील कुमार मंधना यांनी डायरी लिहिल्यानंतर सगळ्यांसाठी चहा बनवला. त्यात गुंगी आणणारी पावडर मिसळली. चहा पिल्यानंतर डॉक्टरची पत्नी चंद्रप्रभा (48), मुलगा शिखर (18) आणि मुलगी खुशी (14) बेशुद्ध पडले, नंतर डॉक्टरने तिघांनाही वेगवेगळ्या खोल्यात नेले. डॉक्टरने अगदी सहज पत्नीचा खून केला तसेच शिखर व खुशीचा गळा दाबला व फरार झाला. हत्या झाली त्या ठिकाणी रक्ताने माखलेला हातोडा आढळला. जाणकारांचे म्हणणे असे की, एक व्यक्ती तीन जणांची हत्या करू शकत नाही. हत्येच्या आधी तिघांनाही बेशुद्ध केले असावे. शवविच्छेदन अहवालातून सर्व खुलासा होईल.









घटनास्थळी आढळली डायरी
हत्येच्या ठिकाणी सापडलेल्या डायरीवरुन डॉक्टरला ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटविषयी चिंता सतावत असल्याचं दिसतं. ओमिक्रॉन सर्वांचा जीव घेईल, माझ्या निष्काळजीपणामुळे, मी अशा ठिकाणी अडकलो आहे, जिथून बाहेर पडणं कठीण आहे. असं डॉक्टरने डायरीत लिहिलं आहे. डायरीमध्ये त्याने आपण आपल्या कुटुंबाला वार्‍यावर सोडू शकत नाही. त्यामुळे सर्वांना मोक्ष मिळवून दिला आहे, असंही त्याने म्हटलं आहे तर या डॉक्टरने देखील आत्महत्या केल्याचा संशय असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कोविडमुळे आले नैराश्य
डॉ.मंधना यांनी स्वत:ला कोविड फोबियाचा बळी सांगितले. त्यांनी डायरीत लिहिले की, आता कोविड नाही. हा कोविड सगळ्यांना मारून टाकेल. आता मृतदेह नाही मोजायचे तर ओमायक्रॉन. सुशील कुमार मंधना वैद्यकीय महाविद्यालयात फोरेन्सिक विभागाचे प्रमुख होते. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कोविड रुग्णालयात मंधना यांनी कोविड रुग्णांना खूप जवळून तडफडत मरताना पाहिले होते. त्यांच्या वेदना व यातना त्यांच्या मनातून काही जात नव्हत्या. कोरोनाची दुसरी लाट थांबल्यापासून त्यांना नैराश्य आल्याचे सांगण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !