मुंबईतील धरणे आंदोलनात रावेर तालुक्यात कोतवाल सहभागी होणार
रावेर : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या मुंबई येथील होणार्या धरणे आंदोलनात रावेर तालुक्यातील सर्व कोतवाल सहभागी होणार आहे. या संदर्भात तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मुंबई येथे सोमवार, 13 डिसेंबर रोजी आझाद मैदानात होणार्या बेमुदत आंदोलनात रावेर तालुक्यातील सर्व कोतवाल सहभागी होतील, या संदर्भातील रावेर येथील तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना देण्यात आले.
विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा
महसुल विभागाचा का, नाक, डोळे समजला जाणार्या तसेच तळागळातील शेतकर्यापर्यंत जाऊन प्रत्येकांच्या शंकेचे निरसन करणारा महसूल विभागातील महसूल गोळा करण्यासह गौण खनिज , निवडणूक, नैसर्गिक आपत्ती, पीक पाहणी आदी विविध कार्यक्रमात कोतवाल हा महत्वाची भूमिका वठवतो मात्र गेल्या 60 वर्षांपासून कोतवाल बांधवांना चतुर्थ श्रेणी मिळावी यासाठी सातत्याने भांडावे लागत आहे. कोतवालांना चतुर्थ श्रेणी देण्यात यावी , तलाठी व तत्सम पद भरतीत 25 टक्के आरक्षण देण्यात यावे, सेवानिवृत कोतवालांना पेन्शन व वारसांना सेनेत सामावून घ्यावी, अशी मागणी करीत रावेर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर तालुकाध्यक्ष सचिन कोळी, सचिव प्रेमचंद पवार, विनोद अटकाळे, प्रवीण धनके, महेंद्र चौधरी, विकास माळी यांच्या स्वाक्षर्या आहेत.


