भुसावळ विभागात महामानवास अभिवादन
महापरीनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन : भुसावळातील महामानवाच्या पुतळ्यास अभिवादनासाठी उसळली गर्दी
भुसावळ : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाण दिनानिमित्त शहर व विभागात विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन करण्यात आले. भुसावळ शहरातील जुन्या पालिका कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिवसभर गर्दी झाली होती. यानिमित्त विविध संघटनांनी सामाजिक उपक्रम राबवले.
दीपनगर सेंट्रल बँक
दीपनगर : सेंट्रल बँकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. दीपनगरचे मुख्य अभियंता विजय राठोड यांच्याहस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महामानवास अभिप्रेत असलेले लोकशाही मूल्य व समाज निर्माण होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राठोड यांनी यावेळी केले. सूत्रसंचालन शैलेंद्र सपकाळे यांनी केले. प्रसंगी सहव्यवस्थापक विवेक ठाकूर, व्यवस्थापक अतुल अग्रवाल, व्यवस्थापक विश्वास माळी, पी.डी.सोनवणे, लोकेश सपकाळे, अनिल इंगळे, वसंता काकडे, गणेश लहाने, राजू वराडे, कॉन्स्टेबल सोनवणे, दिनेश साळवे आदींची उपस्थिती होती.
रीपाइं डेमोक्रॅटीक पक्ष, भुसावळ
भुसावळ- रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटीक) पक्षातर्फे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. नगरपालिकेच्या जुन्या कार्यालयासमोरील महामानवाच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष विजय बाबूराव साळवे यांच्यासह पदाधिकारी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रसंगी सुनील बाबूराव जोहरे, अनिल बाबूराव जोहरे, धम्मचारी जीनचंद्र, राजूभाऊ सोनवणे, शशी रायमळे, नितीन साळवे, सुरेश भोसले आदींची उपस्थिती होती.
भोळे महाविद्यालयात महामानवास अभिवादन
भुसावळ ः दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर यांनी बुद्धवंदना सादर केली. याप्रसंगी प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीत केलेल्या कार्याचे स्मरण करीत त्यांनी देशामध्ये समता, बंधूता आणि सार्वभौमत्व निर्माण होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे यांनी तर आभार प्रा.डॉ.दयाधन राणे यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ दयाधन राणे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.निर्मला वानखेडे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण यांच्यासह सर्व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कुर्हा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
कुर्हाकाकोडा ः ग्रामपंचायत कार्यालयात महापरीनिर्वाण दिनानिमित्त महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. लोकनियुक्त सरपंच सुनीता विश्वनाथ मानकर, उपसरपंच पुंडलिक कपले, ग्रामपंचायत सदस्य अनिल पांडे, मनोहर निंबाळकर, कडू खिरळकर, शांताराम इंगळे, विलास हिरोळे, विस्ताराधिकारी जयपाल चिंचोरे, लिपिक दिनकर गुरव, भैय्या कांडेलकर आदी उपस्थित होते. स्व.लक्ष्मीनारायण चौधरी आश्रम शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जुनगरे, राजेश महाजन, सोनवणे, पवित्रे, मुळे, चौधरी आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या पवित्र स्मृतीस पोलिस उपनिरीक्षक परवीना तडवी, कॉन्स्टेबल संजय लाटे, कॉन्स्टेबल गोपीचंद सोनवणे, कॉन्स्टेबल संभाजी पाटील, पोलीस पाटील विजय पाटील, होमगार्ड गोपाल पाटील आदी उपस्थित होते.
नाहाटा महाविद्यालय, भुसावळ
भुसावळ : भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभाग आणि मानसनीती व समाजशास्त्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी होते. प्रास्ताविक प्रा.एस.के. राठोड यांनी केले. मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.के.के.अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्ते प्रा.व्ही.ए.सोळुंके म्हणाले की, पुरोगामी विचारवंत समजून घ्यायचे असतील तर पुरोगामी विचाराचे असले पाहिज. तसेच उपभोकत्यानं विवेकशील असावे हे मत मांडले. प्रा.वंदना महाजन-नेमाडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेचे विचार व कार्याचा परामर्श घेतला. प्रा.प्रतिभा गलवाडे यांनी डॉ.बाबासाहेबांचा दूरदृष्टीकोण मांडला. कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्राचार्य डॉ.एम.व्ही.वायकोळे, उपप्राचार्य प्रा.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.ई.भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन प्रा.पुरुषोत्तम महाजन यांनी तर आभार प्रा.गौतम भालेराव यांनी मानले. यावेळी प्रा.डॉ.जे.एफ.पाटील, डॉ.एस.पी.झनके, डॉ.पी.ए.अहिरे, प्रा.एस.टी.धूम, डॉ.आर.एस.नाडेकर, डॉ.डी.एम.टेकाडे, डॉ.स्मिता चौधरी, डॉ.प्रफुल्ल इंगोले, प्रा.ए.पी.नवघरे, प्रा.डॉ.निनू झोपे, डॉ.किरण वारके, डॉ.दिनानाथ पाठक, डॉ.दीपक शिरसाठ, डॉ.मनोज पाटील, डॉ.राजेंद्र तायडे, डॉ.ललित तायडे, डॉ.सचिन राजपूत, प्रा.अजय तायडे, प्रा.कौस्तुभ पाटील, प्रा.केंद्रे, डॉ.स्वाती महाजन, प्रा.भारती सोनवणे, प्रा.कविता पांडव, प्रा.प्रियंका महाजन, प्रा.योगीता भंगाळे, प्रा.उज्वला महाजन, प्रा.मुग्धा भालेराव आदींची उपस्थिती होती.
भुसावळ डीआरएम कार्यालय
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ डीआरएम कार्यालयात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन डीआरम एस.एस.केडिया यांनी पूजन केले. प्रास्ताविक सहायक कार्मिक अधिकारी बी.एस.रामटेके यांनी केले. अपर मंडल रेल प्रबंधक नवीन पाटील, रुकमैया मीणा, वरीष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे व इतर अधिकारी तसेच मान्यता प्राप्त युनियन तथा असोसिएशनचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्व कल्याण निरीक्षकांनी परीश्रम घेतले.
जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी
भुसावळ : जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटीतर्फे महामानवास राजीव गांधी वाचनालयात अभिवादन करण्यात आले. प्रतिमा पूजन जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान यांनी केले. यावेळी माजी आमदार नीळकंठ फालक, राजेंद्र पटेल, आर.जी.चौधरी, सलीम गवळी, डॉ.नईम मझहर, संजय खडसे, गोविंदा पाटील, चंद्रसिंग चौधरी, जॉनी गवळी, महेबूब खान, प्रा.शेख हमीद, सायराबानो, प्रदीप नेहते, कविता इंगळे, यासीन बानो, शीला परदेशी आदींची उपस्थिती होती.
भुसावळ वकील संघ
भुसावळ : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाण दिनानिमित्त भुसावळ वकील संघातर्फे अभिवादन करण्यात आले. जिल्हा व सत्र न्या.एस.पी.डोरले म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय नागरीकांना समता, बंधुता न्याय देण्याचे काम केले आहे व संविधान ही त्यांची अनमोल भेट आहे. प्रास्ताविक अॅड.तुषार पाटील यांनी केले. अॅड.सुनील पगारे व अॅड.धीरज शंकपाल यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एम.जाधव, दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर व्ही.जी.चौखंडे, दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर एम.पी.बिहारे, दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर आर.आर.अहिर, डी.एम.शिंदे आदी उपस्थित होत्या. यावेळी वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड.धनराज मगर, सदस्य अॅड.विश्वंभर वाणी, अॅड.विजय तायडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन खान सर यांनी तर आभार अॅड.पुरुषोत्तम पाटील यांनी मानले.



