पुरनाड चेकपोस्टवरील अवैध व अवजड वाहतूक बंद करावी

मनसेची मागणी : सात दिवसाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा


मुक्ताईनगर : पुरनाड चेकपोस्टवरून होणारी अवैध वाहतूक तसेच अवजड वाहतूक बंद करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. सात दिवसात ओव्हरलोड वाहतूक बंद न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राहुल काळे यांनी दिला. यावेळी तालुकाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य मधु भोई, तालुका सचिव अतुल जावरे, श्रीराम भोई, मंगेश कोळी, मुकेश झाल्टे, यश पाटील, गजू पाटील, पंकज बोर्डे, दुर्गेश देशमुख, अक्षय पाटील, आयुष्य सोनार, धीरज पाटील, तेजस पाटील, मनीष खर्चे, अक्षय देशमुख, तन्मय पाटील, सागर पाटील, अश्विन निंबाळकर, अक्षय हारगडे, भूषण हारगडे, हर्षल भिका पाटील, सचिन पाटील आदींची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !