यावलला जुक्टोच्या मेळाव्यात पदाधिकार्यांची निवड
यावल तालुका अध्यक्षपदी प्रा.एच.डी. पाटील तर सचिवपदी हेमंत पाटील
यावल : यावल तालुका जुक्टो संघटनेचा मेळावा सानेगुरुजी कनिष्ठ महाविद्यालयात झाला. या मेळाव्यात नूतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. या प्रसंगी जळगाव जिल्हा ज्युक्टो संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.नंदन वळींकार, सरचिटणीस प्रा.सुनील सोनार, प्रा.श्रीकांत जोशी, प्रा.निवृत्ती वाणी, जिल्हा कार्यकारीणी सदस्य प्रा.अनिल सोनवणे (यावल) आदी उपस्थित होते.
तालुकाध्यक्षपदी प्रा.एच.डी.पाटील
प्रसंगी यावल तालुकाध्यक्षपदी प्रा.एच.डी.पाटील (साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय, यावल) तर उपाध्यक्षपदी प्रा.नितीन पाटील (म्युन्सिसीपल हायस्कूल व ज्यु.कॉलेज, फैजपूर) तसेच चेतना चौधरी (पी.एस.एम.एस कनिष्ठ महाविद्यालय, बामणोद) तर
सचिवपदी हेमंत प्रकाश पाटील (प्रभात विद्यालय, हिंगोणे), सहसचिव कैलास वाघूळदे (भारत कनिष्ठ महाविद्यालय, न्हावी,) ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.श्रीकांत जोशी (सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय, यावल), कार्याध्यक्ष प्रा.उत्पल चौधरी (फैजपूर), खजिनदार प्रा.एन.सी.वाणी (अट्रावल), प्रा.सौ.स्नेहल वाणी (साने गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय, यावल,) तालुका प्रतिनिधी प्रा.मेहमूद खान (यावल), प्रा.पी.ए.पाटील (सांगवी) आदी पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. प्रसंगी शिक्षकांना भेडसावणार्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रा.नंदन वळींकार व सचिव प्रा.सुनील सोनार यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले. प्रा.दिलीप बोदडे यांनी शिक्षकांना येत असलेल्या समस्या मांडल्या. सूत्रसंचालन प्रा.अनिल सोनवणे तर आभार प्रा.गणेश पाटील यांनी मानले.


