पिंप्रीत एकास मारहण : सहा जणांविरोधात गुन्हा
यावल : तालुक्यातील पिंप्री येथील 50 वर्षीय प्रौढ व्यक्तीला क्षुल्लक कारणावरून सहा जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीला आली. मारेकरी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यावल पोलिसात गुन्हा दाखल
सुखदेव प्रभाकर सपकाळे (50, रा.पिंप्री, ता.यावल) हे शुक्रवार, 10 डिसेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास गावातील वडाच्या झाडाखाली उभे होते. मारहाण केल्याचा जाब विचारात संशयीत आरोपी पुंडलिक सपकाळे, सुकदेव गबा सपकाळे, भास्कर पुंडलिक सपकाळे, धमेंद्र पुंडलिक सपकाळे, विजय पुंडलिक सपकाळे आणि एक महिला (सर्व रा.पिंप्री, ता.यावल) यांनी सुकदेव सपकाळे यांना बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली तर यातील पुंडलि सपकाळे याने कुर्हाडीच्या लाकडी दांडाने सुकदेव सपकाळे यांच्यासह त्यांची पत्नी व चुलत भाऊ यांना बेदम मारहाण केली. यावल ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर सुकदेव सपकाळे यांनी यावल पोलिसात तक्रार दिल्यानंतर संशयीत आरोपी पुंडलिक सपकाळे, सुकदेव गबा सपकाळे, भास्कर पुंडलिक सपकाळे, धर्मेंद्र पुंडलिक सपकाळे, विजय पुंडलिक सपकाळे आणि एक महिला (सर्व रा.पिंप्री, ता.यावल) यांच्याविरोधात यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाण करणार्या सर्वांना यावल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस रिीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक जवरे करीत आहे.


