यावलमध्ये 65 हजारांचे सागवान जप्त : वनविभागाच्या कारवाईने खळबळ


यावल : यावल वनविभागाने गोपनीय माहितीवरून सुतगिरणी परीसरातील संशयीत आरोपी अर्षद शेख याच्या मालकिच्या पत्री शेडमध्ये छापा टाकत 65 हजार रुपये किंमतीचे सागवानी लाकूड शुक्रवार, 10 रोजी सायंकाळी जप्त केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. संशयीत आरोपी पसार झाला असून त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. अवैधरीत्या सागवानी लाकडाचा साठा करण्यात आल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

यांच्या पथकाने केली कारवाई
यावलचे सहाय्यक वनसंरक्षक पी.व्ही.हाडपे, यावल पूर्व, यावल पश्चिम वनक्षेत्रातील क्षेत्रीय वनकर्मचारी, वनपाल, वनरक्षक, पोलिस नाईक, वाहनचालक यांच्या मदतीने मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पथकाने छापा टाकत कारवाई केली. संशयीत आरोपी अर्षद शेखच्या पत्र्याच्या शेडमधून रंधा मशीन, लाकूड चिरकाम करण्याचे आणि फर्निचर तयार करण्यासाठी उपयोगात असलेले इतर साहित्यसह सागवान लाकडाचे 10 नग असा एकूण 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !