यावल तालुक्यातून दोन दुचाकींची चोरी


यावल : तालुक्यातील दोन ठिकाणाहून चोरट्यांनी दुचाकी लांबवल्या. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

यावल पोलिसात गुन्हा दाखल
पहिल्या घटनेत यावल-फैजपूर रोडवरील हॉटेल अंजली येथे रशीद अजीज पटले (42, रा.विरारनगर, यावल) हे दुचाकी (एम.एच.19 सी.पी. 5868) ने शुक्रवार, 10 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान त्यांनी हॉटेल अंजलीजवळ दुचाकी लावली मात्र अज्ञाताने 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी शनिवार, 11 डिसेंबर रोजी सांयकाळी 5 वाजता यावल पोलिसात तक्रार दिल्यानंतर यावल पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

साकळीतून लांबवली दुचाकी
यावल तालुक्यातील साकळी शिवारातील मनवेल रोडवर शेख हकीम अब्दुल हकीम (39, रा.साकळी) दुचाकी (एम.एच.19 बी.आर.8879) ने शनिवार, 11 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 1 वाजेच्या दरम्यान शेतात गेले. शेताच्या बांध्यावर त्यांनी दुचाकी उभी करून लावली व शेतात कामावर निघून गेले. अज्ञात चोरट्यांनी पार्क केलेली दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी शेख हकीम यांनी यावल पोलीसात दुचाकी चोरीची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय पाचपोळ करीत आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !