प्रामाणिकपणा जिवंत : 25 हजारांचा मुद्देमाल असलेली पर्स भुसावळातील इसमाने केली परत
भुसावळ : दुचाकीवरून जात असलेल्या डॉक्टर महिलेची पर्स पाणी गेटदरम्यान पडली मात्र भुसावळातील ईसमाला ती मिळाल्यानंतर त्यांनी ती प्रामाणिकपणे महिलेला परत करीत प्रामाणिकपणाचे दर्शन घडले.
शहर पोलिसांच्या उपस्थितीत महिलेला मिळाली पर्स
शहरातील डॉ.वैशाली फेगडे (सहकार नगर, भुसावळ) या पाणी गेटवरून दुचाकीने जात असताना त्यांची पर्स गहाळ झाली. या पर्समध्ये 20 हजारांचा मोबाई तसेच पाच हजारांची रोकड व एटीएमसह अन्य महत्वाचे कार्ड होहते. फेगडे यांनी या संदर्भात शहर पोलिसात धाव घेत माहिती दिल्यानंतर कॉन्स्टेबल योगेश घुगे पाणी गेटजवळ पर्सचा शोध घेतला मात्र ती आढळली नाही तर खालीद हुसेन ईस्माईल पिंजारी (रा.मुस्लिम कॉलनी, भुसावळ) यांना ती पर्स सापडल्यानंतर त्यांनी सुरक्षीत ठेवत पोलिसांच्या ताब्यात दिली. पिंजारी यांना पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत फेगडे यांना पर्स परत करण्यात आली.


