मुक्ताईनगर पोलिसांचा पोलीस महासंचालकांनी केला गौरव


मुक्ताईनगर : जबरी दरोड्याची उकल करीत सहा आरोपी गजाआड करणार्‍या मुक्ताईनगरातील पोलिस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचा जळगाव येथे अपर पोलिस महासंचालक विनय कारगावकर (नागरी हक्क संरक्षण महाराष्ट्र राज्य, मुंबई) यांच्याहस्ते प्रशस्तीपत्रक देवून सन्मान करण्यात आला. उपविभागीय पोलिस पोलीस अधिकारी विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल खताळ, सहाय्यक फौजदार निकम, पोलिस नाईक संतोष नागरे, कॉन्स्टेबल संजय लाटे, कॉन्स्टेबल राहुल नावकर, कांतीलाल केदारे, नितीन चौधरी आदींना प्रशस्तीपत्रक देवून गौरवण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !