यावलजवळ बायोडिझेलची बेकायदा वाहतूक : एकाविरोधात गुन्हा दाखल


यावल : भुसावळ-यावल रोडवर बेकायदेशीररीत्या बायोडिझेलची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी जपत केला आहे. या प्रकरणी यावल पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

90 हजारांचे बायोडिझेल जप्त
यावल-भुसावळ रोडवरील महाराष्ट्र-गुजरात ढाब्यासमोर शुक्रवार, 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास (एम.एच. 48 टी. 1783) क्रमांकाचा ट्रकमध्ये बेकायदेशीर बायोडिझेल घेवून जात असल्याची गोपनीय माहिती यावल पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने धडक कारवाई करत बायोडिझेलची वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला. पोलिस कारवाई करत असल्याची माहिती संशयीत आरोपी शेरखान जुबेर खान (काजीपूरा, ता. यावल) याला मिळाल्याने ट्रक सोडून तो पसार झाला आहे. पोलिसांनी अंदाजे 90 हजार रुपये किंमतीचे बायोडिझेल आणि ट्रक असा एकूण तीन लाख 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी शेरखान जुबेर खान याच्याविरोधात यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !