भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीत आज व उद्या भव्य उत्पादन प्रदर्शन


भुसावळ : भुसावळ आयुध निर्माणीत स्वातंत्र्याचा 75 वा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने 14 व 15 डिसेंबर 2021 रोजी दहा वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत भव्य उत्पादन प्रदर्शन लावण्यात येणार आहे. ही प्रदर्शनी कम्युनिटी हॉल, आयुध निर्माणी इस्टेट, भुसावळ येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रदर्शनात प्रवेश हा सर्वांसाठी निशुल्क आहे. स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होत असून त्या निमित्ताने भारत सरकारने अमृत महोत्सव साजरा करण्याचे आयोजन केलेले आहे. नागरीकांनी तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या उत्पादन प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाप्रबंधक वसंत निमजे यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !