चाळीसगावातून बस वाहकाची दुचाकी लांबविली


चाळीसगाव : चाळीसगाव बस आगारातील एका वाहकाने संपाच्या ठिकाणी उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबवली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात दुचाकी चोरींचे सत्र सुरू असल्याने पोलिसांनी दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
चाळीसगाव बस आगारातील वाहक समाधान मोरसिंग राठोड (47) यांनी संपाच्या पाठीमागे उभी केलेली दुचाकी (एम.एच.19 बीडी 9454) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना मंगळवार, 14 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास उघडकीला आली. समाधान मोरसिंग राठोड यांनी रीसरात शोधाशोध केली असता 25 हजार रुपये किंमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी मिळून आली नसल्याने तसेच मित्र विजय मानसिंग वंजारी (रा.उपखेड, ता. चाळीसगाव) यांच्या नावावर असलेली व फिर्यादी वापरत असलेली दुचाकी अज्ञात इसमाने लंपास केल्याचे स्पष्ट झाल्यावर समाधान मोरसिंग राठोड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.









 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !