भुसावळात लेवा विकास महासंघाची 17 रोजी बैठक
केंद्रीय अध्यक्ष विष्णू भंगाळे करणार मार्गदर्शन
भुसावळ : अखिल भारतीय लेवा विकास महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष, जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखालीलेवा विकास महासंघाची बैठक शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता विठ्ठल मंदिर, विठ्ठल मंदिर वॉर्डात होत आहे. भुसावळ, रावेर, यावल, जामनेर, बोदवड आणि मुक्ताईनगर येथील युवक संघटनांच्या प्रतिनिधींची नियुक्ती याप्रसंगी होणार आहे. प्रदेशाध्यक्ष महेंद्र पाटील, युवक जिल्हाध्यक्ष राजेश वारके, जिल्हा उपाध्यक्ष गौरव भोळे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर सरोदे आणि पदाधिकारी उपस्थित राहतील. संघटनेच्या माध्यमातून कार्य करू इच्छिणार्या परीसरातील अधिकाधिक युवकांना उपस्थितीचे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष प्रा.धीरज पाटील यांनी केले आहे.


