भरधाव ट्रकच्या धडकेत नशिराबादमधील दुचाकीस्वार ठार


जळगाव : जळगावातून नशिराबादकडे जाणार्‍या दुचाकीला समोरून येणार्‍या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने नशिराबाद येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवार, 13 डिसेंबर रोजी घडला. याप्रकरणी मंगळवारी 14 डिसेंबर रोजी ट्रक चालकाविरोधात नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले
बापूराव चैत्राम शिलावट (रा.दत्तसागर हॉटेलच्या मागे, नशिराबाद) हे सोमवार, 13 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जळगाव येथून नशिराबादकडे (एम.एच.19 डी.टी.4026) या क्रमांकाच्या दुचाकीने येत असताना सरस्वती फोर्ड शोरूमसमोजवळ भुसावळकडून जळगावकडे जाणारा भरधाव ट्रक (क्रमांक आर.जे.47 जी.ए.954) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत बापूराव चैत्राम हे गंभीर जखमी झाले. त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. यासंदर्भात मयताचा मुलगा दिनेश बापूराव सिलावट यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक चंद्रलाल हिरालाल (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरोधात मंगळवार, 14 डिसेंबर रोजी दुपारी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !