रेल्वेच्या पेन्शन अदालतीत 145 तक्रारींचा निपटारा

ग्रॅज्युईटी आणि सुट्टी वेतनामधील फरकासाठी 11 लाखांचे वाटप


भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या तक्रारींसंदर्भात बुधवार, 15 रोजी मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात वर्ष 2021 ची द्वितीय पेन्शन अदालत घेण्यात आली. यावेळी एकूण 145 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात 100 टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आले. ज्यामध्ये 11 लाख सात हजार 273 रुपयांची रक्कम देण्यात आली. या व्यतिरिक्त जानेवारी 2020 ते जुन 2021 या कालावधित महागाई भत्यात वाढ झाल्यामुळे 1300 सेवानिवृत्त अथवा मृत कर्मचार्‍यांच्या केसेस पूर्ण करून त्यात ग्रॅज्युईटी आणि सुट्टी वेतनामधील फरकाची रक्कम देण्यात आली.

यांची पेन्शन अदालतीला उपस्थिती
पेन्शन अदालतीस मुख्य न्यायाधीश रुकमैया मीना तसेच लेखा व कार्मिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.डी. गांगुर्डे यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक कार्मिक अधिकारी विरेंद्र वडनेरे यांनी सूत्रसंचालन केले. पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष पी.जे.जावळे, एन.आर.सरोदे यांनी पेन्शनधारक व प्रशासनाच्या समस्या निवारणासंबंधी सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले. सहाय्यक कार्मिक अधिकारी बी.एस.रामटेके यांनी आभार मानले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !