नवापूरात दिड लाखांचा गुटखा जप्त


नवापूर : गुजरात राज्यातून नवापूरमार्गे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटख्याची वाहतूक होत असताना नवापूर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई केली. आठ लाख 59 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तीन व्यक्तींवर नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

कारवाईने उडाली खळबळ
गुजरात राज्यातून महाराष्ट्रात नवापूर मार्गे राज्यात प्रतिबंधित असलेल्या विमल गुटख्याची वाहतूक (एम.एच.04 बी.एन.2923) या गाडीने होत असल्याच्या माहितीवरून नवापूर पोलिसांनी रात्रीच्या गस्तीच्या वेळेस नवापूर शहरातील धडधड्या रेल्वेगेट जवळ गुजरात राज्यातून नवापूर शहराच्या दिशेने येणार्‍या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओला अडवले. या वाहनातून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा वाहतूक होत असल्याचा निदर्शनास आले. पोलिसांनी नवापूर पोलीस ठाण्यात वाहन जमा करीत त्या वाहनातून एक लाख 20 हजार रुपयाचे 2600 विमल पाऊच, तीस हजार रुपये किमतीचे दोन हजार 500 तंबाखू पाऊच जप्त केला आहे. काळ्या रंगाचे स्कॉर्पिओ गाडी एम एच 04 बी एन 2923 आणि एक लाख 53 हजार रुपये किमतीचा विमल गुटखा असा एकूण आठ लाख 59 हजार 350 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
झुलफेकर सय्यद (33), तौसीफ कदर शेख (32), अमित अग्रवाल (सर्व रा.नवापूर) यांच्याविरोधात नवापूर पोलिसात भादवि कलम 328 188 272 273 34 सह अन्नसुरक्षा व मानके अधिनियम 26 (2 ) (4 ) 30 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ, पोलिस शिपाई पंकज सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !