उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उद्या जिल्ह्यात : पोलिसांनी घेतला सुरक्षेचा आढावा


भुसावळ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. जळगावसह भुसावळात त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होत आहेत. यानिमित्त डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी बुधवारी सुरक्षेच्या दृष्टीने कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा.सुनील नेवे, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील उपस्थित होते. दरम्यान, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनीदेखील कार्यक्रमाचा शहरात येवून बुधवारी आढावा घेतला.

भुसावळात उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन कार्यक्रम
उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता जुना सातारा भागातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे लोकार्पण तसेच शहरातील आरपीडी रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दुपारी एक वाजता कार्यकर्ता मेळावा होणार आहे.



अधिकार्‍यांनी केली पाहणी
या दोन्ही ठिकाणांची पोलिस, पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी पाहणी केली. डॉ. आंबेडकर मैदानावर होणार्‍या सभेसाठी लागणार्‍या व्यासपीठाची उंची, लांबी, रूंदी, व्यासपीठाच्या पायर्‍या कशा हव्यात? याबाबत सूचना डीवायएसपी वाघचौरे यांनी सूचना दिल्या. दरम्यान, सकाळी जिल्हा बँक संचालक रोहिणी खडसे यांनी सभास्थळाची पाहणी केली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कार्यकर्त्यांना सूचना देखील दिल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !