भुसावळसह जळगावात अमृत योजनेला दिरंगाई : अजितदादांनी केली अधिकार्‍यांनी कान उघाडणी

भुसावळचे आमदार संजय सावकारे व जळगावचे आमदार राजूमामा भोळेंनी मांडला मुद्दा


जळगाव : जिल्हा दौर्‍यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जिल्ह्याच्या आढावा बैठकीत विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्यातील कोविड लसीकरणाची माहितीदेखील घेण्यात आली. यावेळी जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे व भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी अमृत योजनेच्या संथगतीने सुरू असलेल्या कामाबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांना सूचना दिल्या.

अमृत योजनेमुळे भुसावळकरांचे हाल
भुसावळ शहरात अमृत योजना मंजूर असून या योजनेच्या जाचक अटींमुळे अन्य कामे करण्यास अडचणी येत असल्याची माहिती आमदार सावकारे यांनी दिली तसेच दुसरीकडे योजनेचे काम पूर्ण झाल्याशिवाय रस्ते करू नये, असे आदेश असल्याने यातून मार्ग काढण्याची अपेक्षाही आमदारद्वयींनी यावेळी व्यक्त केली.



मुंबईत तोडगा काढणार : अजितदादा
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी यावेळी अजित पवार यांची बोलताना मुद्दा मांडला की, राज्य सरकारने अमृत योजनेच्या कामात घातलेल्या नियमांमध्ये बदल करावा जेणेकरून संपूर्ण काम झाल्याशिवाय नवीन रस्ते बनणार नाही हा जो नियम आहे तो बदलता येईल. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की याबाबत मुंबईमध्ये बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !