नियोजनबद्ध अभ्यास केल्यास यश हमखास : उपप्रादेशिक परीवहन अधिकारी श्याम लोही

चाळीसगावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी धनगर समाज उन्नती मंडळाच्यावतीने गुणवंतांचा गौरव


चाळीसगाव : परीश्रम घेतल्यास यश प्राप्त झाल्याशिवाय राहात नाही त्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध अभ्यास करून परीक्षेला सामोरे गेले पाहिजे, असे विचार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी येथे व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी धनगर समाज उन्नती मंडळ चाळीसगावच्या वतीने धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार, 12 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत चाळीसगावात झाला. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी तसेच विविध खेळातील नैपुण्य प्राप्त खेळाडू व शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम अहिल्यादेवी नगर मधील अहिल्यादेवी समाज भवनात घेण्यात आला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित रावते, प्रमुख पाहुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही, शिवाजी हाडपे, धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष साहेबराव आगोणे, उपाध्यक्ष देविदास आगोणे, नवनाथ ढगे, शांताराम हाडपे, योगेश रावते आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक हेमंत देवरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सरला कोर (ढगे ) यांनी केले. प्र






परीश्रम घेतल्यास यश हमखास
मुख अतिथी श्याम लोही यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अभ्यासाचे महत्त्व पटवून देत परिश्रम घेतले यश प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही यासाठी विद्यार्थ्यांनी यांनी नियोजनबद्ध अभ्यास करून परीक्षेला सामोरे गेले पाहिजे असे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. शिवाजी हडपे यांनी प्रबोधनात्मक विचार मांडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी सुमारे 165 गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील नैपुण्य प्राप्त खेळाडू उपस्थित होते. राष्ट्रीय खेळाडू बेसबॉल कॅप्टन रेखा धनगर, विशाल धनगर, निशा वेळे व दिव्या साबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी समजातील जेष्ठ मार्गदर्शक रमेश जानराव, राजेंद्र रावते, बापू सोनवणे आदी मान्यवरांसह संदीप हडप, अ‍ॅड.कैलास आगोणे, अ‍ॅड.प्रमोद आगोणे, मुख्याध्यापक अशोक देवरे, योगेश साबळे (सचिव), रवींद्र आगोणे, मारुती काळे, शंकर लेणेकर, एकनाथ आगोणे, सोमनाथ आगोणे, शांताराम आगोणे, पांडुरंग बोराडे, भैय्यासाहेब सूर्यवंशी, दिलीप बोराडे, प्रमिलाबाई काळे, पंढरीनाथ रावते, ज्ञानेश्वर वेळे, गणेश जाणे, शिवाजी जाणे, धीरज सूर्यवंशी, राजेंद्र साबळे, साहेबराव गायकवाड, भानुदास रावते, सुनील साबळे, रघुनाथ साबळे, प्रा.डॉ.विजय शिरसाठ डॉ.डी.पी.देवरे, राजेश रावते, संगीता आगोणे, विमलबाई साबळे, संगीता साबळे आदी धनगर समाज बंधू-भगिनी उपस्थित होते. दिलीप जाणे व विश्वनाथ अहिरे यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड.खंडू कोरे यांनी आभार मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !