भडगावातील घरफोडीची उकल : तिघे आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


भडगाव : शहरातील यशवंतनगर भागात झालेल्या चोरी प्रकरणी एलसीबीच्या पथकाने तिघांना अटक केली.

गोपनीय माहितीवरून अटक
भडगावातील यशवंतनगर भागात अर्जून भिल्ल यांच्याकडे 9 डिसेंबरला घरफोडी झाली होती. त्यात सुमारे 8 हजार 500 मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला होता. या चोरीप्रकरणी एलसीबीच्या पथकाने सुनील परशुराम पवार (22), अनिल विरभान सूर्यवंशी (27), विजय प्रकाश घोडेस्वार (19) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात मोबाइल आणि चार हजार रुपये रोख हस्तगत केले आहे. संशयितांना भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.






यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक महाजन, हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, पोलिस नाईक रणजीत जाधव, नंदलाल पाटील, किशोर राठोड, भगवान पाटील, ईश्वर पाटील, उमेश गोसावी, विनोद पाटील, श्रीकृष्ण देशमुख, चालक पवार यांच्या पथकाने केली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !