15 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले : जळगावातील घटना
जळगाव : जळगाव शहरातील एका भागात राहणार्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील एका भागात 15 वर्षीय मुलगी आपल्या आई-वडील यांच्यासह वास्तव्याला आहे. शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता अल्पवयीन मुलगी आजीच्या घरी गेली होता. त्यावेळी तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमीष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. अल्पवयीन मुलीचा परीसरात शोधाशोध केली परंतु मिळून आले नाही. या संदर्भात मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री 11 वाजता अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.





