फैजपूर परीसरात अवैध वाळू वाहतूक : दोघांवर गुन्हा दाखल


फैजपूर, ता.यावल : शहरातील पिंपरूळ फाट्याजवळ चोरटी वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर चालकाने व त्यांच्यासोबत असलेल्या एकाने महसूल कर्मचार्‍याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध वाळू वाहतूक पुन्हा ऐरणीवर
फैजपूर ते भुसावळ रोडवर असलेल्या पिंपरूळ फाट्याजवळ आणि फैजापूर शहरातील एका भागात शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 ए.पी.8562) वरील चालक किरण भोई (रा. फैजपूर, ता.यावल) हा विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करत असताना तलाठी यांनी रंगेहाथ पकडले होते. या संदर्भात ट्रॅक्टर फैजपूर येथील स्टेशनला घेऊन जाण्याच्या सांगितले असता त्याचा सहकारी (पूर्ण नाव माहीत) नाही हा (एम.एच.19 डी.एफ.4843) वर दुचाकीवर घेऊन ट्रॅक्टर पळवून नेऊन पसार झाले. या संदर्भात दहिगाव सजा येथील तलाठी विलास भिकाजी नागरे (38, रा.यावल) यांच्या फिर्यादीवरून शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता फैजपूर पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालक आणि एक अनोळखी दुचाकीधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !