जळगावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण
जळगाव : शहरातील शिव कॉलनी येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना समोर आली असून प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल
शिवकॉलनी परीसरात अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबीयांसोबत राहते. शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी रात्री साडेसात वाजता मुलगी कुणाला काही एक न सांगता घरातून निघून गेली व घरी परतली नाही. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल निलेश पाटील हे करीत आहेत.





