अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक : रावेरात चार ट्रॅक्टर जप्त


रावेर : अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे चार ट्रॅक्टरसह ट्रॉली सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास रावेर महसूल पथकाने जप्त केल्याने अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणार्‍या वाहतूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
सोमवारी रात्रीच्या सुमारास मोरगाव खिरवड नदी पात्रातील नाल्यामध्ये अवैध गौण खनिजची वाहतूक होत.असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाल्यानंतर सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास महसूल पथकाने घटनास्थळी जाऊन चार ट्रॅक्टर ट्रॉली एम.एच.19 ए.एन.2447, एम.एच.19 टी.1630, स्वराज्य कंपनीचे नवीन ट्रॅक्टर व ट्रॅक्टर एम.एच.19 सी.वाय.1641 जप्त करण्यात आले. ही कारवाई मंडळ अधिकारी विठोबा पाटील, गजेंद्र शेलकर, सुधीर सोनवणे, जे.डी.बंगाळे यांच्या पथकाने केली. सध्या रावेर तालुक्यात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात गौण खनिज वाहतूक केली जाते. याकडे तहसीलदार यांनी लक्ष देण्याची मागणी जनतेतून होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !