एक कोटींचे ब्राऊन शुगर प्रकरण : मुख्य सप्लायर्सला 24 पर्यंत पोलिस कोठडी
भुसावळ : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक रावेर पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत रावेर शहरातून आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किंमत असलेले तब्बल अर्धा किलो हेरॉईन (ब्राऊन शुगर) जप्त केल्याची कारवाई शनिवार, 11 डिसेंबर रोजी केली होती. या प्रकरणी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून अख्तरी बानो अब्दुल रऊफ (45, रा.मोमीनपुरा बडा, कमेलापास, ता.जि.बर्हाणपूर) या महिलेला अटक करण्यात आली होती तर महिलेला ब्राऊन शुगरचा पुरवठा करणारा मध्यप्रदेशातील संशयीत सलीम खान शेर बहादुर खान (किटीयानी कॉलनी, मनसौर, मध्यप्रदेश) याच्याही पथकाने शनिवारी रात्री उशिरा मुसक्या आवळल्या होत्या. आरोपी सलीम खान याला जळगाव विशेष न्यायालयाचे सत्र न्या.एम.बी.बोरा यांना 24 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपीतर्फे अॅड.जैनोद्दीन शेख तर अख्तरी बानोतर्फे अॅड.सत्यनारायण पाल तसेच सरकार पक्षातर्फे अॅड.मोहन देशपांडे यांनी काम पाहिले.


