रावेर तालुक्यात बिबट्याने पाडला तीन बकर्यांचा फडशा
रावेर : रावेर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम आहे. बिबट्याने पुन्हा हल्ला करीत तीन बकर्यांचा फडशा पाडल्याची घटना चुनवाडे, ता.रावेर येथील शेतीशिवारात घडली. या घटनेने शेतकरी, शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. चुनवाडे, ता.रावेर येथे शेतशिवारात चरत असलेल्यातीन बकर्यांवर अचानक बिबट्याने हल्ला चढवत त्यांचा फडशा पाडल्याचे सांगण्यात आले. या घटनेने पशूपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाचे दुर्लक्ष होत असून हिंस्र प्राणी गावाकडे येत असल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


