भुसावळात उद्या राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन


भुसावळ : शहरातील राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 रोजी 11 वाजता भुसावळ तहसीलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ आमदार संजय सावकारे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत अध्यक्ष अ‍ॅड.कल्पना टेमाणी, अखिल भारतीय ग्राहक पंचायत अध्यक्ष,  ग्राहक पंचायत जिल्हा संघटक प्रा.प्र.ह.दलाल, ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे जिल्हा सचिव अ‍ॅड.जास्वंदी भंडारी, ग्राहक कल्याण फाऊंडेशन तालुकाध्यक्ष उज्वला बागुल, ग्राहक पंचायत जिल्हा सदस्य संजय शुक्ल आदींची उपस्थिती राहणार आहे. शहरवासीयांनी कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन भुसावळ तहसीलदार दीपक धीवरे यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !