छत्रपती शिवरायांचा अपमान करणार्या विकृतांवर कारवाई करा : यावलमध्ये राष्ट्रवादीचे निवेदन
यावल : कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये काही विकृत मनोवृत्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडल्यानंतर तेथील सरकारकडून डोळेझाक होण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. त्यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त विधान करून शिवभक्तांच्या भावनांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याने दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रशासनाला निवेदन देवून केली आहे.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना यावल तालुकाध्यक्ष मुकेश येवले, विजय पाटील, देवकांत पाटील, करीम मणियार, राकेश कोलते, बोदडे नाना, कामराज घारू, गुणवंत नीळ, प्रतिभा नीळ, पितांबर महाजन, बापू जासूद, आयुब खान, दत्त कडु पाटील, नरेंद्र पाटील, भगवान बर्डे, निवृत्ती धांडे, अशोक भालेराव, किशोर माळी, नरेंद्र शिंदे, विनोद (सोनू) पाटील, फारुख मुंशी, भागवत अटवाल, विजय साळी, नीलिमा धांडे, आरीफ खान, नंदा गोपाल महाजन, किरण पाटील, मोसीन खान, गणेश तायडे, हितेश गजरे, गोपाल काकडे, दीपक पाटील, विलास येवले, तुषार येवले, सविता चौधरी, ममता आमोदकर, निलेश आमोदकर, मगदूल तडवी, सागर शिंदे, गणेश तायडे, लकडुसिंग बारेला, भूषण खैरे, पवन पाटील, विशाल वाणी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


