भुसावळात अनोळखीचा मृत्यू : ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
भुसावळ : शहरातील ट्रामा केअर सेंटरमध्ये 65 वर्षीय भिकारी असलेल्या इसमास गँगरीन आजाराच्या उपचारासाठी दाखल करण्यात आले असता 2 सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ.मयूर चौधरी यांच्या खबरीनुसार बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मयताची अद्याप ओळख पटलेली नसून ओळख पटत असल्यास बाजारपेठ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अंमलदार यासीन सत्तार पिंजारी (7020309469) यांनी केले आहे.


