पहूर शिवारातून इलेक्ट्रिक पाणबुडी व केबल वायरची चोरी
पहूर : पहूर शिवारातील एका शेतकर्याच्या शेतातून इलेक्ट्रिक पाणबुडीची मोटार व कॉपर केबलची चोरी चोरट्यांनी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
शेती साहित्याच्या चोर्या वाढल्या
रीतेश शिवाअप्पा गोळंबे (36, रा.हनुमानगल्ली, फत्तेपूर, ता.जामनेर) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मंगळवार, 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 ते रात्री 11 वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतात असलेल्या गट नंबर 18/1 मधून शेतातील आठ हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रिक पाणबुडी मोटार आणि तिला जोडलेली 70 फूट कॉपर वायर तसेच एक हजार रुपये किमतीची प्लॅस्टिकची टाकी असा एकूण नऊ हजार रुपये किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी शेतकरी रीतेश गोळांबे यांच्या फिर्यादीवरून पहूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण चौधरी करीत आहे.




