17 वर्षीय तरुणाची आत्महत्या
जळगाव : पिंप्राळा भागात राहणार्या 17 वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. घनश्याम संजय भोई (17, रा.पिंप्राळा हुडको, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. विशेष बाब म्हणजे स्मार्टफोनचा कॅमेरा सुरू करीत चित्रीकरण करून या तरुणाने आत्म्हत्या केल्याचे समजते.
घरी कुणी नसताना उचलले पाऊल
घनश्याम संजय भोई (17, रा.पिंप्राळा हुडको जळगाव ) या तरूणाने शुक्रवारी सायंकाळी आत्महत्या केली. घनश्याम हा आई मंदाबाई, वडील, मोठी बहिण गीता भोई यांच्यासह सेट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा परिसर जळगाव येथे वास्तव्यास होता. आई-वडील आणि मोठी बहिण हे धार्मिक कार्यक्रमासाठी मूळगावी नेरी पिंप्री जामनेर येथे गेल्याने तो घरात एकटाच होता. शुक्रवारी 24 डिसेंबर रोजी त्याने राहत्या घरात गळफास घेतला. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. दरम्यान अल्पवयीन मुलाने गळफास का घेतला? याचे कारण स्पष्ट हावू शकले नाही. दरम्यान, मयताच्या मोबाईलमध्ये आत्महत्येची घटना रेकॉर्ड झाल्याचे सांगण्यात आले.




