राज्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ रवाना
राज्य स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची बिहारमधील पटना येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार निवड
भुसावळ : महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची 21 वी ज्युनियर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा रत्नागिरी (चिपळूण) येथे होत असून या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा व शहर संघ रवाना झाला.
जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेतर्फे निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीतून व दोन दिवसीय शिबिरानंतर जिल्हा व शहर संघ निवडण्यात आला.
जळगाव जिल्हा संघात यांचा समावेश
या संघात कर्णधार ओम पाटील, चेतन लोधे, प्रेम भोगल, ज्ञानदीप सांगुरे, सोमनाथ चव्हाण, अबुजर पटेल, कृष्णा चव्हाण, राहील बच्छाव, गौरव पाटील, राज कदम, वैभव दहाड, सागर सरदार, मिथुल नागारिया, सचिन राठोड तर प्रशिक्षक प्रतीक कुलकर्णी
तसेच व्यवस्थापक तारीख अहमद यांचा समावेश आहे.
जळगाव शहर संघात यांचा समावेश
तुषार पाटील, प्रतिश इंगळे, सुयोग अधलकर, मोहित पाटील, कर्णधार मिर्झान तडवी, सचिन पवार, दक्षक चव्हाण, नकुल गळे, सलमान तडवी, भैय्या जोशी, सोहेल तडवी, धीरज इंगळे तसेच प्रशिक्षक विकास पाटील व व्यवस्थापक वसीम शेख यांचा समावेश आहे.
पटना येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार खेळाडूंची निवड
रत्नागिरी (चिपळूण) येथील राज्यस्तरीय स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर जानेवारीच्या दुसर्या आठवड्यात पटना बिहार येथे होणार्या राष्ट्रीय ज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी राज्य संघाची निवड करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय स्पर्धेअंती श्रीलंका येथे होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड पटना येथे होणार आहे. दरम्यान निवड झालेल्या संघाला जिल्हा क्रीडा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक आमदार चंद्रकांत सोनवणे, शकील पटेल, डॉ.प्रदीप तळवलकर, प्रा.आनंद उपाध्याय, जिल्हा सचिव वासेफ पटेल, प्रा.आसीफ खान, प्रा.संजय चौधरी, प्रदीप साखरे, रमण भोळे, प्रा.संजय भावसार, संजय राजपूत, योगेश साळुंखे, प्रतीक खराले, युवराज माळी, खुशाल देशमुख आदींनी शुभेच्छा दिल्या.


