रावेरातील रेल्वे प्रवाशाची एसी डब्यातून पर्स लांबवली
भुसावळ : एलटीटी ते रावेर असा कुशी नगर एक्स्प्रेस या गाडीतून प्रवास करीत असलेल्या प्रवासी डॉ.नम्रता योगेश महाजन (रा.रावेर) यांची पर्स चोरट्यांनी लांबवली. पर्समध्ये पाच हजार रूपये रोख , एटीएम कार्ड, पॅनकार्ड आदी साहित्य होते. याप्रकरणी भुसावळ जीआरपी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महाजन या कुशी नगर एक्स्प्रेसच्या ए-1 या डब्यातील सीट एक वरून डॉ. नम्रता महाजन (रा. रावेर) या एलटीटी ते रावेर असा प्रवास करीत असताना चाळीसगाव ते पाचोरा दरम्यान चोरी झाली.


