किनगाव खुर्दचे माजी सरपंच शुक्रामअण्ण्णा पाटील यांचे निधन


यावल : किनगाव खुर्द येथील रहिवासी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी शुक्राम व्यंकट पाटील (82)यांचे सोमवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झालेफ शुक्राम आण्णा पाटील यांनी किनगाव खुर्द ग्रामपंचायतीचेी 10 मार्च 1969 ते 25 जानेवारी 1985 या कलावधीत सतत 17 वर्षे बिनविरोध सरपंच पद भुषवले होते. आपल्या राजकीय प्रवासात आण्णांनी ग्राम पंचायत, फ्रूटसेल सोसायटी, विविध कार्येकारी सोसायटीत व्हा.चेअरमन अशीे विविध पदे भुषवली.

शेतकरी दिंडीतही सहभाग
7 डिसेंबर 1980 रोजी माजी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या सोबत ते जळगाव ते नागपूर शेतकरी दिंडीमध्ये सहभागी झाले होते. आण्णा शरदचंद्रजी पवार यांचे निकटवर्तीय होते. सुरूवातीला काँग्रेस पक्षात व नंतर शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी काम केले व प्रदेश प्रतिनिधी म्हणून कार्यभार सांभाळला. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्याशीही त्यांची जवळीक होती. त्यांच्यासोबतही ते पदयात्रेत सहभागी झाले होते. आण्णांना राजकीय प्रवासात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी आमदार रमेशदादा चौधरी, माजी गृहमंत्री सोनुसिंग धनसिंग पाटील, इंग्लडचे माजी हायकमिश्नर ना.ग.गोरे, माजी विधानसभा अध्यक्ष व राज्यमंत्री बाळासाहेब मधुकरराव चौधरी, माजी बांधकाम मंत्री जगंन्नाथ रावजी जाधव, माजी महसूलमंत्री उत्तमराव पाटील, माजी गृहराज्य मंत्री जे.टी.दादा महाजन, शेतकरी संघटनेचे प्रनेते शरद जोशी, के.एम.पाटील, सिने अभिनेते निळू फुले यांचा सहवास शुक्राम आण्णांना लाभला.

पंचक्रोशीत मिळवला नावलौकीक
शेतकरी कुटुंबातील शुक्राम आण्णा आपल्या साधारण राहणीमान व मनमिळाऊ स्वभाव तसेच प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होणे या कारणानमुळे पंचक्रोशीसह राज्यात नावलौकीक मिळवला होता. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परीवार आहे. ते किनगाव खुर्दचे लोकनियुक्त सरपंच भूषण पाटील यांचे आजोबा होत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !