‘सुर्य गौरव’ राष्ट्रीय पुरस्काराने सुभाष ललवाणी यांचा सन्मान
अण्णा हजारे यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण
कजगाव, ता.भडगाव : गावातील स्थानिक रहिवासी तथा पुण्यातील यशस्वी उद्योजक सुभाष ललवाणी यांना शनिवार, 25 रोजी सुर्यदत्ता इन्स्टीट्यूटतर्फे ‘सुर्य गौरव’ या राष्ट्रीय पुरस्काराने पद्मविभूषण अण्णाहजारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिर्डी संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत-धीवरे, सुर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. संजयजी चोरडीया उपस्थित होते.


ललवाणी मूळचे कजगावचे भूमिपूत्र
पुणे येथील नामांकित शिक्षण संस्थेच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना विविध राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. या वर्षीच्या ‘सुर्य-गौरव’ राष्ट्रीय पुरस्काराने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष ललवाणी यांना संस्थेच्या वतीने थोर समाजसेवक, पद्मविभुषण श्री आण्णा हजारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. ट्रॉफी, मेडल, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सुभाष ललवाणी हे मुळचे कजगाव. ता.भडगाव येथील भूमिपुत्र असून हल्ली पुण्यसात उद्योजक म्हणून स्थायीक झाले आहेत. ललवाणी हे सामाजिक क्षेत्रात सदैव कार्यरत असून त्यांनी जैन समाजातील अडीच ते तीन हजार विवाह जोडले आहेत. विविध संस्थेवर ते कार्यरत आहेत. या अगोदरदेखील ललवाणी यांना अनेक ठिकाणी गौरविण्यात आले आहे. सुभाष ललवाणी हे कजगावचे जेष्ठ पत्रकार प्रमोद ललवाणी यांचे ज्येष्ठ बंधू आहेत.
