भरधाव वाहनाने उडवले : 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू


शिरपूर : शिरपूर-शहादा रस्त्यावर अर्थे वाघाडी दरम्यान अज्ञात वाहनाचे दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील 60 वर्षीय वृद्ध जागीच ठार झाला. सोमवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. भटू बाबुराव गुरव (60, वाघाडी, ता.शिरपूर) असे मयताचे नाव आहे.

अपघातानंतर पोलिसांची धाव
भटू बाबुराव गुरव हे सोमवार, 27 डिसेंबर रोजी सकाळी वाघाडीकडून अर्थेकडे दुचाकी (जी.जे. 05 एल.ई.7957) वरून जात असतांना सोमवारी 7.30 वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने भटू बाबुराव गुरव यांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जी.डी.पावरा व कॉन्स्टेबल गणेश सोनवणे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह वाहनाने उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !